
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे मळई येथिल हनुमान मंदीरामध्ये दि. १ ते ३ एप्रिल या कालावधी दरम्यान हनुमान मंदीर वर्धापन दिन सोहळा व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच स्वाकृतील कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाच्यावतीने दि. 1 ते 3 एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीरामध्ये श्री हनुमान मंदीर वर्धापन दिन, श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा.पासून पुजा आरती, लघुरूद्र, सायंकाळी महाआरती, स्थानिक भजने व रात्री 9 वाजता स्थानिक महिलांचा कलाविष्कार फुगडी हे कार्यक्रम होणार आहेत.गुरूवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 6.33 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती,दर्शन व तीर्थप्रसाद, पालखीप्रदक्षिणा,सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी 1 वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने, रात्री 10.30 वाजता धमाल विनोदी मालवणी दोन अंकी नाटक बायको शिवाय काय खरा नाय हे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न होणार असून 10.30 वाजता स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार दिंडी भजन सोहळा इत्यादी कार्यक्रमांची सकाळपासूनच रेलचेल सुरू असणार आहे. या कार्यक्रमास मोठ्यासंखेने भाविकांनी उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे मंदिर न्यासच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.











