सिंधुदुर्ग शरद पवारांसोबत : माजी मंत्री बाळासाहेब पाटील

Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 13:07 PM
views 330  views

सावंतवाडी : राज्यात राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा काही परिणाम झाला नाही. सिंधुदुर्ग शरद पवार यांच्या सोबतच आहे असं मत राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक निवडणुका होत नसल्याने राज्यात प्रशासनावर कोणाचा अंकुश राहला नसल्यामुळे अधिकाऱ्यांचा मनमानी  कारभार सुरू असल्याचा आरोप देखील बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केला आहे.

याप्रसंगी माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, रेवती राणे, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, पुंडलिक दळवी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.