
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. राज्यातील जिल्हा नियोजन निधी खर्चाच्या बाबतीत सिंधुदुर्गने अव्वल स्थान मिळवले असून हा जिल्ह्याच्या कार्यक्षम प्रशासनाचा व गतिमान विकासाभिमुख धोरणांचा महत्वाचा टप्पा मानला जातोय.
राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गचा खर्च 68.873 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईसह अन्य मोठे जिल्हेही सिंधुदुर्गच्या मागे पडले आहेत.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी राज्याच्या बांबू औद्योगिक धोरणातून सिंधुदुर्गचे नाव वगळण्यात आले होते; मात्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे ते नाव पुन्हा सामाविष्ट करण्यात आले. आता जिल्हा नियोजन निधी खर्चातही सिंधुदुर्गने बाजी मारत राज्यात पहिली रँक पटकावली आहे.
या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीला नवी गती मिळाली असून, प्रशासन आणि जनतेतुन समाधान व्यक्त होतं आहे.
पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर जिल्हा नियोजन संभा आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच घेत मार्च एन्ड ची वाट न पाहता डिसेंबर अखेर जिल्हा नियोजन चा ९० टक्के हुन अधिक निधी खर्ची घालून अतिरिक्त बोनस साठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करू, असा विश्वास व्यक्त करत तशा कडक सूचना जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या. त्याचं पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्याने टॉप रँक पटकावत पालकमंत्री नितेश राणे यांचा मनोदय सक्सेस करून दाखवलाय हे विशेष.