अमृत कलशांसह सिंधुदुर्गची टीम मुंबईत दाखल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 26, 2023 19:45 PM
views 102  views

देवगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त मेरी मटि मेरा देश अभियान अंतर्गत अमृत कलश यात्रेद्वारे सिंधुदूर्गचे स्वंयसेवक अमृत कलश घेऊन मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत . सिंधुदुर्गातुन निघालेल्या या कलश यात्रेचे उद्घाटन सिंधुदुर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री . किशोर तावडे यांनी सर्वाना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

यानंतर सर्व स्वंयसेवक व जिल्हा समन्वयक यांच्या बसला दिल्ली येथील प्रस्थानासाठी हिरवा झेंडा दाखविला . यावेळी प्रकल्प संचालक श्री .उदय पाटील ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सामान्य किशोर काळे , गटविकास अधिकारी अजिक्य सावंत , नगरविकास अधिकारी संतोष जिरगे , नगरविकासचे निखिल नाईक , विस्तार अधिकारी श्री . महादेव शिंगाडे , विस्तार अधिकारी नानचे , विस्तार अधिकारी फाले , ग्रामविकास अधिकारी माणगांवकर , अधिक्षक मालंडकर ,  ग्रामविकास विभागाचे सुनिल राऊळ , गणेश जंगले , मुकुंद सातर्डेकर , श्रीम .गजश्री सुतार , श्रीटेंबकर , साईम वायंगणकर , श्रीमती . नांदोस्कर,आदी मान्यवर उपस्थित होते .

           या अभियान अंतर्गत मुंबई व दिल्ली येथील  कार्यक्रमासाठी सिंधुदूर्ग जिल्हाची २० जणांची टिम रवाना झाली त्यात जिल्हा नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी श्री अजिक्य सावंत , जिल्हा समन्वयक अधिकारी विस्तारअधिकारी श्री . महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक गुणवंत पाटील , विनायक धुरी , मनिष सावंत , विराज वेटे , अक्षय मोडक , सुजय जाधव , विल्सन फर्नाडीस, समिर चौधरी , ऐश्वर्य मांजरेकर , भाग्यश्री मांजरेकर , उद्देश सावंत , समिल नाईक , श्रद्धा चव्हाण , विघ्नेश चव्हाण, मधुकर नवार, सुनाद राऊळ , जगन्नाथ काणेकर , गणेश राऊळ आदी स्वंयमसेवक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत .

        दिल्ली येथे मा .पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी सिंधुदूर्ग जिल्हातुन सर्व आठ नगरपालिकांचा मिळुन एक अमृत कलश व सर्व आठ तालुक्यांचे आठ अमृत कलश घेऊन स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक रवान झाले . राज्यभरातील सर्व जिल्हा मधुन माती एकत्रित करून अमृत कलश दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे मा .मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजीत होणाऱ्या कायक्रमात सहभागी होतील व तेथुन पुढे मा .पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी कर्तव्यपथ दिल्ली येथे रवाना होतील . दिल्ली येथे देशभरातुन आलेल्या सर्व गावागावांतील शहरांमधील माती एकत्रित करून अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे .