
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत. हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस बळाने आपली ताकद दाखवावी. बेकायदा दारु, मटका व जुगार बंदच झाले पाहिजेत. अनैतिक धंदे या जिल्ह्यात नकोच यासाठी जिल्हा पोलिस दलाने कडक भूमिका घ्यावी व अशा विरोधत करवाई करावी असे आदेश पोलिस अधिकाऱ्याच्या बैठकीत पालकंमंत्री ना. नितेश राणे यांनी दिले.
देशाची सागरी सुरक्षा म्हत्वाची आहे. आपल्या जिल्हाला सन २०१४ मिळालेल्या ९ बोटी कालबाह्य झाल्या आहेत. १० अद्ययावत स्पीड (स्टील) बोटी द्याव्यात अशी चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झाली आहे. निवासस्थान दुरुस्ती म्हत्वाची आहे. वाईट परिस्थिती आहे ४ कोटी ८० लाख मागणी आहे. वाहन व्यवस्थेसाठीही निधीही उपलब्ध करुन देऊ. जिल्हयात अंदाजे ४४ हजार जेष्ठ नागरिक आहेत, त्या जेष्ठ नागरिक सेवा संघाशी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व त्या जेष्ठ नागरिकांशी संवाद साधावा असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दीले. गावागावात दारू अड्डे महिला व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यावर लक्ष द्या. ग्रामसभा होत असतात. त्यामध्ये बेकायदा दारू विक्री बाबत अनेक तक्रारी असतात त्याची पोलिसांनी दखल घ्यावी.
पोलिस ठाण्यातील स्वच्छता गृह व निवासस्थानाची वाईट अवस्था आहे. त्यासाठी निधी देऊ. सिंधुदुर्ग जिल्हात अनेक विकासाचे प्रकल्प सुरु आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच डावोस ला जाऊन आलेत. काही गुंतवणूकदार या जिल्ह्यात गुंतवणूक करायला तयार आहेत. काही राजकीय मंडळी अशा उद्योजकांना विरोध करून त्रास देऊन, ब्लॅकमेल करतात हे प्रकार तातडीने थांबायला हवेत. जिल्हा पोलीस दलाने अशा प्रकल्पांना भेटी देऊन अशा ब्लॅकमेलर वर कडक करवाई करा असे आदेश नितेश राणे यांनी दिले