
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्यावतीने दरवर्षी आदर्श ग्रंथालय, आदर्श ग्रंथालय कर्मचारी, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता असे पुरस्कार देण्यात येतात. सन 2024-25 या सालातील आदर्श ग्रंथालय पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली व कुडाळ येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय गोवेरी यांना जाहीर झालाय. तर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार विभाग स्तरीयत पुरस्कार प्राप्त जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष अनंत आप्पाजी वैद्य कुडाळ व नेमळे येथील ग्रंथालयचे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ यांना तसेच ग्रंथालय कर्मचारी सेवक पुरस्कार वेंगुर्ले येथील नगर वाचनालय वेंगुर्ल्याचे कर्मचारी किशोर भगवान सावंत व कळणे येथील ग्रंथालयाचे कर्मचारी सुनिता भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारसाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीची बैठक 25 डिसेंबरला जिल्हा ग्रंथालय संघामध्ये घेण्यात आली. यावेळी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, सचिव राजन पांचाळ, सहसचिव महेश बोवलेकर, संचालक अँड. संतोष सावंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण माणगाव येथे होणाऱ्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनामध्ये 29 डिसेंबरला सकाळी दहा वाजता माणगाव वाचनालय येथे होणार आहे. ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता आदी पुरस्कार प्राप्त व सर्व ग्रंथालय कर्मचारी संचालक उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.