
कणकवली : सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.)च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रमास अन्नदान व आर्थिक मदत केली. यावेळी सुप्रसिद्ध भजनी बुवा दुर्गेश मिठवाबकर यांनी आश्रमामधील आजी - आजोबांसाठी सुश्राव्य भजनगायन केले.
पारंपारिक श्राद्धकर्म घरी करून आपण एका दिवसाचे जेवण आश्रमात दान करावे, असे आवाहन अभिनेत्री कांबळी यांनी यानिमित्ताने केले. यावेळी फाऊंडेशन सदस्य मिलन पाटील, वैशाली राणे, रोहिणी तावडे, श्रद्धा पाटील, माधवी मिठबावकर, विशाखा तोंडोलकर, प्रतीक्षा बांदिवडेकर, तबलावादक मेघपर्ण एकावडे, पखवाज चिन्मय माधव, अनिल कांबळी, सागर पाटील उपस्थित होते.यावेळी आश्रम संचालक संदेश शेट्ये व सर्व कर्मचारी यांनी सर्वांचे आभार मानले.