उद्यापासून होणाऱ्या राज्यव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी !

जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांचे संपात सहभागी होण्याचे आवाहन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 13, 2023 17:05 PM
views 161  views

सावंतवाडी : दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी संपामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ सहभागी असून संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी या संपामध्ये आग्रही मागणी राहणार आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन हा मुद्दा मान्य होत नाही तोपर्यंत पुढील मागण्यांची चर्चाही करायची नाही, असे एकमुखाने ठरवण्यात आले आहे.

अनेक कर्मचारी जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत. म्हणून १४ मार्च २०२३ पासून बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांची राज्य कार्यकारिणीची सभा नाशिक येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाली. या सभेत दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत बेमुदत संप पुकारण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावावर चर्चा झाली व राज्यव्यापी बेमुदत संपाबाबतच्या ठरावास एकमताने मंजुरी दिली. सदर निर्णयानुसार या राज्यव्यापी  संपात सहभागी होण्याचे निश्चित केलेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची ९ मार्च २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था ओरोस सभागृहात बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत सर्वानुमते १४ मार्चपासून होणाऱ्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर बंधू - भगिनींनी दिनांक १४ मार्च २०२३ पासून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी मुख्याध्यापक यांचेमार्फत संस्थाध्यक्ष, सचिव यांना संपात सहभागी होण्याबाबत पत्र देऊन आगाऊ कळविण्यात यावे, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सिंधुदुर्ग यांना संपात सहभागी होत असल्याबाबतचे संघटनेचे पत्र जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर यांच्यामार्फत देण्यात आले.


मोर्चा काढून करणार संप 

सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे दिनांक १४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता मोर्चा निघणार असून या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्यासाठी रवळनाथ मंदिर, ओरोस या ठिकाणी सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या संपाबाबतच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी माजी सचिव उमेश सुकी, माजी अध्यक्ष नारायण माने, सल्लागार अच्युत वनवे, जिल्हा समन्वयक माधव यादव, जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व