
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पोहोचत आहे. त्याच अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यात देखील वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असून सदरच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच अनुषंगाने शनिवारी द१३ जानेला सकाळी ११.०० वाजता दोडामार्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनावीज ग्राहकांची बैठक घेणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी संघाच्या सहकार्याने सदरची वीज ग्राहकांची बैठक दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात होणार असून सदर बैठकीसाठी दोडामार्ग तालुक्यातील वीज ग्राहकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी, समस्या लेखी स्वरूपात मांडाव्यात असे आवाहन जिल्हा वीज ग्राहक संघटनेने केले आहे.
या बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, बाळ बोर्डेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, डॉ. श्रीनिवास गावडे, सावंतवाडी व्यापारी संघ अध्यक्ष जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, दोडामार्ग व्यापारी संघाचे सागर शिरसाट, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष आनंद नेवगी आणि इतर जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य, व्यापारी संघाचे सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.