
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, CTS, Micro ATM Door Step Banking, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. दि.३१ डिसेंबर, २०२४ रोजी बँकेने रू.६०२५ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. व्यवसायाचा हा पल्ला गाठण्यामध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांचा मोठा वाटा राहिला आहे. याबद्दल बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी या सर्वांप्रती आभार व्यक्त केलेले आहेत.
या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक दिलीप रावराणे, समीर सावंत, प्रकाश मोरये, विठ्ठल देसाई तसेच बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.