सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती सदस्यपदी राजाराम धुरी..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 30, 2023 13:22 PM
views 106  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची तर या समितीच्या सदस्यपदी राजाराम धुरी, हरिभाऊ भिसे, सौरभ पाटकर, अजिंक्य पताडे, शैलेश जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी गठीत केली असुन सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा संतोष कानडे यांच्यासह अनेक कलाकारांना मार्गदर्शक असणाऱ्या अशा व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची निवड समितीवर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

राजाराम धुरी यांची या समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजाराम धुरी यांना दशावतार तसेच डबलबारी भजन या क्षेत्रामध्ये स्वारस्य आहे. त्या क्षेत्राची मोठी जाणही आहे. प्रहार डिजीटलवर घेतल्या जाणाऱ्या कलाकरांच्या प्रकट मुलाखतीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. या मुलाखतींच्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा व समस्या समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची या  समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.