हिंदू समाजातील मुलींना ब्लॅकमेलिंग करणाऱ्यावर कारवाईची मागणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 11, 2025 19:22 PM
views 86  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन समाज संघटीत राहतात परंतु अलीकडे स्थानिक मुस्लिम हिंदू समाजातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, भावना भडकवणे, धाक दाखवून अनैतिक घटना ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार वाढत आहेत. आज काही पिडीत मुली गायब आहेत त्यांचा शोध लागायला तीन महिन्याचा कालावधी लागण्याच्या घटना भूषणावह नाहीत अशा गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून पोलीस यंत्रणेने समाजात विश्वास निर्माण करावा   आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष सदाशिव प्रभू यांनी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष सदाशिव प्रभू यांच्यासह सहमंत्री चिन्मय रानडे, सुभाष पुराणिक, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, रविकिरण तोरस्कर, सौ शिल्पा खोत, भाऊ सामंत ऍड.  समीर गव्हाणकर, संदीप बोडवे, श्रेया बोडवे आदीं उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रद्रोही  शक्तींकडून सार्वभौम भारताला आव्हान देणाऱ्या अनेक योजना आखल्या जात आहेत याची माहिती शासनाकडून अनेक वेळा प्रसारित झाली आहे मुस्लिम समाजाकडून लव जिहादसारख्या घटना घडत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू मुसलमान ख्रिश्चन समाज संघटित पणे राहत असतात परंतु अलीकडे स्थानिक मुस्लिम हिंदू समाजातील मुलींना प्रेमाच्या नावाखाली अनेकांना जाळ्यात ओढण्याच्या घटना घडत आहेत सावंतवाडी, आचरा या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.

 राष्ट्रद्रोही शक्तीचा लव जीहादला आळा घालण्याऐवजी आपल्या जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अशा गुन्ह्यातील आरोपीला पाठीशी घालत नाही ना ?असा आमचा संशय आहे आता पोलीस स्टेशन येथे सहा मार्च रोजी तक्रार दाखल झाले आहे परंतु पोलीस यंत्रणेकडून चौकशी केली असता आरोपी सापडत नाही असे म्हणणे पोलिस यंत्रणेसाठी योग्य नाही.गुन्ह्यांच्या तपासात दिरंगाई करणाऱ्या वर कारवाई व्हावी आणि सकल हिंदू व अन्य समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.