सहकारी संस्थांसाठी सहकार पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करावेत : डॉ. सोपान शिंदे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 01, 2025 18:55 PM
views 121  views

सिंधुदुर्गनगरी : सहकार विभागामार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार वितरण करावयाचे आहेत. त्याअनुषंगाने सहकार पुरस्कार सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करावयाचे आहेत, त्यांनी संबंधित तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे संपर्क करण्याचे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.

सहकार विभागामार्फत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार बाबत कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे दिनांक 02 जुलै ते 18 जुलै 2025 या कालावधीत सहकारी संस्थांनी  आपले पुरस्कारासाठीचे प्रस्ताव ज्या तालुक्यात त्यांच्या मुख्यालय आहे, त्या तालुक्यातील तालुका सहाय्यक निबंधक,उपनिबंधक यांच्याकडे सादर करावेत. जिल्हास्तरावर गट नियम, प्रकार नियम किमान 10 संस्थांचे प्रस्ताव आवश्यक आहे. संस्थेचा प्रस्ताव सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असावीत. अपूर्ण कागदपत्रे असल्यास ती तात्काळ पूर्ण करून घेण्यासाठी संबंधितांना मार्गदर्शन करण्यात येईल.

त्यानंतर दि. 21 जुलै ते 30 जुलै 2025 या कालावधीत तालुका सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे छाननी करून प्रस्ताव सादर करणे. त्यानंतर, जिल्हा उपनिबंधक समितीमार्फत दिनांक 31 जुलै ते 08 ऑगस्ट 2025 दरम्यान छाननी करून विभागीय सहनिबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे.

त्यानंतर दि. 11 ते 25 ऑगस्ट या कालावधीत विभागीय सहनिंबधक समितीने छाननी करुन प्रस्ताव सहकार आयुक्त कार्यालयाकडे सादर करावे. त्यानंतर दि. 26 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत सहकार आयुक्त स्तरावरील समितीने प्रस्ताव छाननी करुन शासनाकडे पाठविणे. त्यांनतर दि. 15 ते 26 स्प्टेंबर या कालावधीत शासन स्तरावरील सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुरस्कार प्राप्त संस्थांची निवड केली जाईल. शासनाच्या मान्यतेने पुरस्कार  वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.