मुख्यालय पत्रकार संघाची प्रदर्शनास भेट

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 30, 2025 18:39 PM
views 113  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा नियोजन सभागृहा शेजारी आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आणीबाणीतील प्रमुख प्रसंगांची सचित्र मांडणी, जिल्ह्यातील संघर्षयात्रींची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. या प्रदर्शनाला मुख्यालय पत्रकार संघाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर, संदीप गावडे, नंदकुमार आयरे, गुरुप्रसाद वालावलकर, बाळ खडपकर, मनोज वारंग, श्रीमती तेजस्विनी काळसेकर उपस्थित होते.   

यावेळी सर्व माध्यम प्रतिनिधींनी प्रदर्शनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल आणि प्रदर्शनातील प्रसंगाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी आणीबाणीवर आधारित ध्वनिचित्रफित देखील सर्व माध्यम प्रतिनिधींनी पाहिली.