शासकीय मेडिकल कॉलेजमध्येये 'केअर कम्पॅनियन प्रोग्रॅम'

Edited by:
Published on: June 16, 2025 18:25 PM
views 138  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे  केअर कम्पॅनियन प्रोग्रॅम ( सीसीपी) अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. हि कार्यशाळा योसेड इनोवेटिव फाउंडेशन व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये रुग्णालयातील परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांना रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य शिक्षण देण्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज नंतर रुग्णाची घरच्या घरी प्रभावी काळजी घेता यावी यासाठी रुग्णाच्या कुटुंबियांना सक्षम बनविणे हा केअर कम्पॅनियन प्रोग्रॅमचा मूळ उद्देश आहे.

स्तनपान, नवजात शिशुंची काळजी, संसर्ग प्रतिबंध, जीवनशैली विषयक आजार इत्यादी यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे बाळ आणि आईचे आरोग्य सुधारणा होण्यामध्ये मदत होते, रुग्णाचे रुग्णालयात पुन्हा दाखल होण्याचे प्रमाण कमी होते आणि कुटुंबात आत्मविश्वास वाढतो. सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, डॉ. पल्लवी सापळे यांनी संस्थेच्या भेटीदरम्यान सदर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अनंत डवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे वैद्यकीय उप-अधीक्षक तथा मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रोहित हेरेकर, अधिसेवीका श्रीमती. शारदा वसावे यांनी सदर कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली. या कार्यशाळेकरिता योसेड इनोवेटिव फाउंडेशन तर्फे डॉ. सौरभ गुरव, डॉ. शकील जाधव, डॉ. विराज गरड व श्री संकेत ढोले उपस्थित होते. हा उपक्रम महाराष्ट्रातील २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये राबविला जात आहे. सिंधुदुर्ग येथील प्रशिक्षणाने आरोग्य सेवकांना कौशल्यवृद्दीची संधी मिळाली असून रुग्णांसाठी देखील हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे.