वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागामध्ये लघुशस्रक्रियागृह सुरु होणार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 09, 2025 18:51 PM
views 148  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये  राष्ट्रिय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानंकानुसार लवकरच लघुशस्रक्रियागृह सुरु होणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग चे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दि. ६ जून रोजी झालेल्या रुग्णालयीन राउंड मध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभाग येथे जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान नाक व घसा शास्त्र, नेत्र चिकित्सा शास्र, स्रीरोग इत्यादि विभागाशी संबंधित लघु शस्रक्रिया विविध विभागाशी संबंधित सर्जन व तज्ज्ञांमार्फत पार पाडल्या जातील. लघु शस्त्रक्रियांमध्ये शरीरावर असलेल्या विविध गाठी जसे कि चरबीच्या गाठी, घामाच्या ग्रंथीच्या गाठी, सिस्ट तसेच कर्करोगाशी संबंधित बायोप्सी, लिफ नोड बायोप्सी, अल्सर सर्जरी इत्यादी शस्त्रक्रिया होणार आहेत.या शस्त्रक्रिया ह्या डे - केअर सर्जरी मध्ये मोडत असल्यामुळे याकरिता रुग्णांना रुग्णालयामध्ये भरती होण्याची आवश्यकता नसणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड इत्यादी तसेच आधार लिंक मोबाईल फोन आवश्यक असणार आहे, असे प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे कळविले आहे.