
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २१ ऑगस्ट २०२४ रोजीपासून ते ४ सप्टेंबर २०२४ रोजी २४ वा. पर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी साजरे होणारे सण, उत्सव, त्याअनुषंगाने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, सोशल मिडीयावार व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचीत प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी या करिता हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (अ) ते (फ) आणि ३७ (३) प्रमाणे दिनांक २१.०८.२०२४ रोजी ००.०१ वाजलेपासून ते दिनांक ०४.०९.२०२४ रोजी २४.०० वा. पर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेत.