सिंधू रनर टीमच्या शिरोडा - गोवा ते सावंतवाडी 100 किमी इंटरसिटी रनचा शुभारंभ !

Edited by: ब्युरो
Published on: April 30, 2024 14:14 PM
views 313  views

गोवा : १ मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिना निमित्त सिंधू रनर टीम ने गोवा ते सावंतवाडी इंटरसिटी १०० किलोमीटर ची अल्ट्रा रन आयोजित करण्यात आली होती. या अल्ट्रा रनची सुरुवात ३० एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री देवी नवदुर्गा मंदिरातुन (बोरी फोन्डा गोवा) इथून साऊथ गोवा चे विधानसभा उमेदवार संकेत नाईक मुळे आणि माजी मुख्याध्यापक श्री माथूरदास नाईक यांच्या हस्ते करण्यात आली.

पुढे फोन्डा, मंगेशी, पणजी अट्टल सेतू, पर्वोरीम, धारगळ, तम्बोसा, बांदा मार्गे सावंतवाडी असे १०० किलोमीटर अंतर पार करून १६ धावक सावंतवाडी राजवाडा येथे  १ मे २०२४ रोजी सकाळी 9 वाजता पोचणार आहेत.