
सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था रक्तदान चळवळीत एक अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी मदत केली जाते.तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण गोवा राज्यातील गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी जात असतात, यावेळी पुष्कळदा रक्ताची आवश्यकता भासते, त्यामुळे गोमेकॉतील वाढती रक्ताची गरज ओळखून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या व मित्रसंस्थांच्या माध्यमातून गोमेकॉ रक्तपेढीला गेल्या वर्षभरात ७०० हुन अधिक रक्त बॅग्सचा पुरवठा करण्यात आला.त्याची विशेष दखल गोवा स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कॉन्सिल या संस्थेकडून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी - दोडामार्ग विभागीय अध्यक्ष व गोमेकॉ रक्तपेढीचे सिंधुदुर्गचे सिंधु रक्तमित्र समन्वयक संजय पिळणकर, तसेच प्रतिष्ठानचे सदस्य तथा आयुष चॅलेंजर्सचे नाना राऊळ आणि प्रतिष्ठानचे सदस्य तथा रोटरॅक्ट बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी स्वीकारला.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचा महाराष्ट्र राज्याबाहेरील पहिलाच बहुमान असून हे संस्थेच्या रक्तदात्यांमुळे व मित्रसंस्थांच्या परिश्रमाचे फळ आहे.या पुरस्काराबद्दल जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी हा पुरस्कार जिल्ह्यातील तमाम रक्तदाते व मित्रसंस्था विशेषतः दोडामार्ग शाखा,वेंगुर्ला शाखा सावंतवाडी शाखा तसेच बांदा मंदार कल्याणकर निलेश मोरजकर,अक्षय मयेकर यांच्या मित्रसंस्था यांचा आहे असे सांगून प्रतिष्ठानतर्फे गोमॅको रक्तपेढीचे आभार मानले.