विठ्ठल-रखुमाई मंदिरात आदित्य मसुरकर परिवारकडुन चांदीची प्रभावळ

Edited by: विनायक गावस
Published on: November 10, 2023 20:02 PM
views 186  views

सावंतवाडी : शहरवासीयांच श्रद्धास्थान असणाऱ्या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री आदित्य विनायक मसुरकर  यांच्या परिवारकडुन चांदीची प्रभावळ पांडूरंगा चरणी अर्पण करण्यात आली. तर रखुमाईसाठी बाळा उर्फ बाळकृष्ण मठकर परिवाराकडून सोन्याची नथ अर्पण करण्यात आली. श्री मठकर यांनी सप्त्नीक येऊन विठ्ठल रखुमाईची विधीवत पूजाअर्चा करत ही नथ अर्पण केली.