
सावंतवाडी : श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापनेला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई आणि नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दिनांक 10 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 3 वाजता मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, सायंकाळी पाच वाजता ग्रामस्थांचे भजन, रात्री 7 - 9.30 वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री 9 वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच वावळेश्वर दशावतार मंडळ तेंडोली प्रस्तुत ट्रिक्सिनयुक्त दशावतारी नाटक 'अयोध्याधीश श्रीराम' रात्री 10 वाजता सादर होणार आहे.
तसेच दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता 'महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम', सायंकाळी 5 वाजता प्रा. रुपेश पाटील प्रस्तुत 'जागर श्री शक्तीचा, खेळ पैठणीचा' हा ज्ञानातून मनोरंजन व मनोरंजनातून प्रबोधनावर आधारित हा कार्यक्रम सादर होईल. रात्री 9 वाजता वेशभूषा स्पर्धा तसेच मनोरंजनातून धमाल कॉमेडी कार्यक्रम सादरकर्ते चंद्रहास राऊळ व रात्री 10 वाजता अरुण गवंढळकर यांचा कार्यक्रम होणार आहे. 12 व 13 मे 2025 रोजी हिरण्यकेशी क्रीडा मंडळ बॉक्स क्रिकेट लिंक (गावठणवाडी मर्यादित) संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दशरथ सावंत व सचिव भारत गुरव तसेच श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई व नवचैतन्य कला क्रीडा मंडळ आंबोली - गावठणवाडी यांनी केले आहे.