
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नाणोस - नाणोसकरवाडी येथील शेत तळीत भली मोठी मगर दिसून आली आहे. याठिकाणी अलीकडेच ब्रीजकम बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. या बंधाऱ्यातील पाणी सोडल्याने या तळीत मगर निदर्शनास आली आहे. यापूर्वी मळेवाड येथील नदीत मगरीचे वास्तव्य दिसून आले होते. त्यानंतर आता नाणोस येथे मगर दिसून आल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.