
सिंधुदुर्ग : श्रावण महिना म्हणजे व्रत, वैकल्य,उपवास सण वाराचा महिना. या महिन्यात महिलांचे मंगळा गौरीचे विशेष व्रत असते. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. यात विविध प्रकारचे खेळ खेळण्यात येतात.
दादासाहेब फाळके पुरस्कारासह सह अनेक सन्मानाचे पुरस्कार विजेत्या सुवर्णलता प्रकाश वांगे यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.००वाजता, शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे "श्रावण क्वीन स्पर्धा २०२५ " चे आयोजन केले होते.स्पर्धेत मंगळागौरीत खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मिस इंडिया इंटरनेशनल विनर, मिस महाराष्ट्र कोमल रुपरेलिया, डान्स फॅशन आणि गरबा जुरी सिद्धेश जाधव यांनी काम पहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून सुवर्णा भागवत यांनी तसेच वैशपायन गमरे, शेखर दाते, केदार वांगे, प्रशांत पवार यांनी व्यवस्थापनाचे काम पहिले.तन्वी बनसोड यांच्या निवेदनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. महिलांसाठी दोन गटात या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेस महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या स्पर्धेत चूरशीच्या लढतीत सिद्धी संतोष झगडे यांनी प्रचंड मेहनत घेऊन सेकंड रनर अपचे पारितोषिक मिळवले. याकरिता कु.सिद्धी संतोष झगडे यांना स्वर स्वामी कला साधना चे संचालक गणेश हातगे, प्रियांका हातगे, सौरभ हातगे, राजेश हुनारी यांचे फार मोलाचे सहकार्य लाभले.










