सिद्धार्थ युवक मंडळाकडून ११ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Edited by:
Published on: May 06, 2024 11:45 AM
views 65  views

सावंतवाडी : सिद्धार्थ युवक मंडळ सिद्धार्थनगर शेर्ले येथे शनिवारी ११ मे रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाल आंबेडकर अनुयायानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.     

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त नगररचनाकार तथा जिल्ह्यातील नामांकित कवी साहित्यिक पुरुषोत्तम कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून आघाडीचे युवा पत्रकार तथा पर्यावरणवादी कार्यकर्ते अॅड. ऋषिकेश नंदू पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष महादेव संभाजी जाधव हे उपस्थित असून यावेळी सायंकाळी आठ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिद्धार्थ युवक मंडळाने केले आहे.