
मालवण : तारकर्ली देवबाग रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा होतं असून अपघात होण्याची भीती श्याम झाड यांनी व्यक्त केली होती. झाडे तोडण्याबाबत बांधकाम विभागाचे लक्षही वेधले होते. अखेर बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेत या मार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडली आहेत. याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामस्थांनीही बांधकाम विभागास सहकार्य करत वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे बांधकाम विभागाकडून तोडून घेतली आहेत. यावेळी देवानंद लोकेगावकर, मिलिंद झाड, श्याम झाड, धनु रोगे, मोहित झाड, भूषण पाटील, संदेश धुरी आदी उपस्थित होते.










