
कणकवली : श्रीधर नाईक यांचा ३४ वा स्मृतिदिन रविवार दि. २२ जून येथील श्रीधर नाईक चौक येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ९ वा. कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थित हार अर्पण केला जाणार आहे. ९.३० वा रक्तदान शिबीर, सकाळी १० वा. कणकवली तालुक्यातील प्रशाळेतील प्रथम,द्वितीय, तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कणकवली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अरुण दूधवडकर, माजी खासदार तथा ब्रिगेडिअर सुधीर सावंत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, राष्टÑवादी (श.पा.)चे जिल्हाध्यक्ष अमित सावंत, माजी जि.प.सदस्य बाळा भिसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व श्रीधर नाईकप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले आहे.