
सावंतवाडी : श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) मंदिर, सबनीसवाडा सावंतवाडी येथे शनिवारी 24 ऑगस्ट 2024 रोजी श्री टेंबेस्वामी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सर्व गुरुभक्तांनी श्रीस्वामी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.एकमुखी दत्त मंदिर व श्री.वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक सल्लागार उपसमिती, सावंतवाडी यांनी केले आहे.
यावेळी सकाळी 6 ते 8 श्री.दत्तपुजा, अभिषेक, एकादशमी, 8 ते दु.12 लघुरुद्र, 12.30 श्रींची आरती, 1 ते 3 महाप्रसाद, 5 ते 7 सुरश्री संगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम (सौ.मंजिरी धोपेश्र्वरकर), 7 ते 7.30 नामस्मरण, 8 वाजता श्रींचा पालखी सोहळा, रा.9 वाजल्यापासून भजन आदी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.