स्वामींच्या पालखीचं भक्तगणांकडून दर्शन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 18, 2023 15:22 PM
views 116  views

सावंतवाडी : दत्त जयंतीचे औचित्य साधून येथील स्वामी भक्तांच्या माध्यमातून शहरात आज स्वामी समर्थांची पालखी काढण्यात आली. यावेळी "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"च्या जयघोषात ही पालखी शहरात फिरविण्यात आली. सबनिसवाडा येथील दत्तमंदिरातून ही पालखी काढण्यात आली. त्यानंतर शहरात मिरवणूक काढून ती गरड येथील स्वामी समर्थ केंद्रापर्यंत नेण्यात आली. या मिरवणूकीत स्वामी भक्त मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते.