श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: March 27, 2024 06:34 AM
views 119  views

सावंतवाडी : दाणोली येथिल योगी संत श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या ८७ वा  पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी दाणोलीनगरीत मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटकमधील‌ भाविक साटम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले.

पहाटे काकड आरती,अभ्यंगस्नान, बोभाटे बुवा यांचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू होती. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम संपूर्ण दिवसभर पार पडणार असून रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार आहे‌. रात्री उशिरा देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ, चेंदवण यांचा  महिमा जगन्नाथ पुरीचा हा ट्रिकसिनयुक्त दशावतार नाटक होणार आहे.