
देवगड : श्री संत बाळूमामा पायीवारी देवगड यांच्यावतीने आयोजित केलेल्या श्री संत बाळूमामा पालखी पायीवारी चे प्रस्थान ९ जाने. रोजी होणार आहे.
सकाळी ९ वा. देवगड भास्कर उद्यान गणपती मंदिर येथून विधीवत पूजा आरती करून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवता श्री दिर्बादेवी रामेश्वराचे दर्शन घेऊन तळेबाजार, शिरगाव, नांदगाव फोंडाघाट दाजीपूर राधानगरी मार्गे आदमापूर कडे मार्गस्थ झाली.११ जाने रोजी सायं.ही पालखी पायीवरी आदमापूर येथे पोहचणार आहे.