
सावंतवाडी : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक परमपूज्य श्री सद्गुरु मियासाब यांचा ७८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा बुधवार १४ जून रोजी होत आहे. जिल्ह्यासह गोव्यातील भाविक देखिल पुण्यतिथी निमित्त दर्ग्यावर डोक टेकतात.
सद्गुरु मियासाब यांचा ७८ वा पुण्यतिथी निमित्त सकाळपासून सद्गुरू पूजन, नामस्मरण, किर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार आहे. यावेळी सर्व भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन सद्गुरु मियासाब पुण्यतिथी उत्सव सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.