
सावंतवाडी : श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे या हायस्कूल चा दहावी शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के येवढा लागला असून परीक्षेस बसलेले सर्व च्या सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये श्रद्धा संतोष चिले हिने ९४.६० टक्के गुणांसह प्रशालेतून प्रथम क्रमांक मिळविला तर प्रणाली आनंद परब ९१.६०टक्के गुणांसह व्दितीय क्रमांक तर , कुंदन नवीन भराडी याने ९०टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.तर दिया देविदास गावकर हीने ८९.६० हीने चतुर्थ तर , आदिती अर्जुन वर्णेकर हीने ८२.८० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला. विशेष श्रेणीत १३, प्रथम श्रेणीत ३ तर द्वितिय श्रेणी मध्ये २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष वामन कविटकर,मुख्याध्यापक राजेंद्र देसाई सरांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.