
वेंगुर्ला : वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह ११ ते १८ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. दि. ११ जुलै रोजी स.९ वा. सप्ताहाची सुरूवात, दररोज अष्टोप्रहर भजने, रामेश्वर मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने, दि.१७ रोजी रात्रौ १२ वा.दिडी, दि.१८ रोजी स.१० वा.रामेश्वर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२ वा. काल्याने सप्ताहाची सांगता, त्यानंतर गावाच्या कल्याणासाठी गाहाणे, भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.