
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील श्री दादा साई मंदिर मठात रविवार दि. ३० मार्च पासून श्री रामनवमी उत्सव सोहळा काला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त साईचरित्र वाचन, दिंडी, भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती दादा साई यांनी केले आहे.