श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेश सुरू...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 11:45 AM
views 167  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे पदव्युत्तर विभागातील एम ए, एम कॉम, एम एस सी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.

यामध्ये इंग्रजी, अर्थशास्त्र व हिंदी या विषयांमध्ये एम ए तसेच एम कॉम  व  रसायनशास्त्र,  वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र  विषयामध्ये  एम. एस. सी ची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये सुरू झालेली आहे.मुंबई विद्यापीठाची लिंक सुरू झालेली असून विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन प्रवेश अर्ज भरुन  महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल भारमल यांनी केले आहे.