
देवगड : देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्री कार्तिक स्वामी दर्शन यात्रा २६ व २७ नोव्हेंबर या काळात होणार आहे.
हिंदळे येथील श्री कार्तिक स्वामी मंदिरात रविवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५४ वा. पासून सोमवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३५ वा. पर्यंत पौर्णिमा व कृतिका नक्षत्र एकत्र असल्याने या योगावर कार्तिक स्वामी दर्शन यात्रा होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.