मातोंड येथील भजन स्पर्धेत श्री कलेश्वर, पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये प्रथम..!

Edited by: दिपेश परब
Published on: September 04, 2023 21:41 PM
views 223  views

वेंगुर्ले : तालुक्यातील मातोंड येथील नवोदित कलाकारांच्या भजन स्पर्धेत श्री कलेश्वर, पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर श्री रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, ओटवणे यांनी द्वितीय क्रमांक व गोठण प्रासादिक भजन मंडळ वजराठ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन यांचा गौरव करण्यात आला. 

मातोंड येथील श्री देव रामेश्वर अखंड भजनी हरिनाम सप्ताहा निमित्त येथील समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कला- क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमंत्रित नवोदित बुवांच्या संगीत भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी (२ सप्टेंबर) या स्पर्धेचे समस्त गावकर मंडळी यांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या दिवशी श्री क्षेत्रपालेश्वर प्रसादिक भजन मंडळ, होडावडा (बुवा दत्तप्रसाद गूळेकर), श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, मातोंड- सावंतवाडा (बुवा आदीती  परब), श्री सिद्धेवर, सातेरी भजन मंडळ,  तळवडे (बुवा काशिनाथ परब), गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराठ (बुवा सोमेश वेंगुर्लेकर), श्री रवळनाथ  नवतरुण भजन मंडळ, ओटवणे (बुवा आत्माराम कवठणकर) तर रविवारी (३ सप्टेंबर) दुसऱ्या दिवशी श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ, तळवडे (बुवा विशाल वराडकर),  जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, तळवडे (बुवा वेदिका मोरये), श्री अष्ट्रविनायक प्रासादिक भजन मंडळ, निरवडे (बुवा राज गोवेकर), ईसोटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड- सावंतवाडा (बुवा दादू परब),  श्री कलेश्वर पुर्वी, देवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये (बुवा प्रथमेश निगुडकर) यांनी आपली भजन कला सादर केली.

दरम्यान या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम श्री सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ, तळवडे, तर द्वितीय इसोटी प्रा. भजन मंडळ, मातोंड- सावंतवाडा यांना मिळाला. तर उकृष्ट गायक म्हणून  बुवा आत्माराम कवठणकर (ओटवणे),  उकृष्ट पखवाज वादक म्हणून सागर वारखंडकर (वेत्ये), उकृष्ट तबलावादक समीर धुरी (वजराट),  उकृष्ट झांजवादक शिवराम सावंत (मातोंड सावंतवाडा), उकृष्ट कोरस श्री क्षेत्रपालेश्वर भजन मंडळ, होडावडा, शिस्तबद्ध संघ जय भवानी भजन मंडळ, तळवडे- बादेवाडी यांना मिळाला. या स्पर्धेचे परिक्षण पखवाज अलंकार मनिष तांबोस्कर व प्रसिद्ध भजनी बुवा पुरुषोत्तम परब यांनी काम पाहिले. 

विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, सोसायटी संचालक रवींद्र नाईक, प्रसिद्ध तबला वादक बाळू कांडरकर, माजी उपसरपंच सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश वडाचेपाटकर, प्रमुख गावकर रविकिरण परब, विजय परब (म्हालटकर), संदिप परब (म्हालटकर), रूपक मातोंडकर, मातोंडचे प्रसिद्ध भजनी बुवा विशाल घोगळे, सचिन सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले.