
चिपळूण :
संतोष कुळे यांचा खास लेख
उदे ग अंबे उदे..आई जगदंबे..हा स्वर नवरात्री मध्ये कानावर पडतो आणि मनात नव चैतन्य निर्माण होते. नवरात्रौत्सव महणजे आदिमायेचा जागर... तिच्या अनेक रूपातील व शक्तीपीठातील मायेचा उत्सव, भक्तांच्या रक्षणार्थ सदैव पाठाशी असणारी आदिमायेची अनेक रुपे कोकणात पहावयास मिळतात. नवरात्रीमध्ये अशा मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. अशीच चिपळूण तालुक्यातील बामणोली येथील नवसाला पावणारी श्री चंडकई वाघजाई देवी प्रसिध्द असून नवरात्रोत्सवात याठिकाणी भाविक आवर्जून भेट देऊन देवीला साकडे घालतात, नवसाला पावणाऱ्या या आदिमायेच्या महिमाविषयी थोडक्यात.....
निळ्या आभाळाच्या छायेत आणि गिरीशा डोंगराच्या पावश्याशी, दाभोळ खाडीच्या किनागापासून अवाप्या ५ कि. मी. अंतरावर निसर्गरम्य बामणोली हे गाव वसलेले आहे. या गावाला निसर्ग सौंदयांची देवी देणगीच जणू लाभली आहे. गावाच्या पश्चिमेकडून खळखळ नाद करीत वाहणाऱ्या नद्या, पूर्वेकडील छोटया डोंगरी टेकड्या, मध्येच सपाटी भाग आणि पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार शेती यामुळे निसर्गाने उदार अंतःकरणाने या गावाला सौंदर्य बहाल केल्याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. याच गावात गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री चंडकाई- वाघजाई देवीचे डौलदार मंदिर इतिहासाची साक्ष देत आहे. भक्तांच्या हाकेला पावणारी आणि माहेरवाशिणी व सासरवाशिणी यांची पाठराखण करणारी दुर्गामाता अशी ग्रामदेवतेची ओळख आहे.
श्री चंडकाई-वाघजाई देवीच्या मंदिराचा इतिहास हा जागृत आहे. हे देवस्थान अबालवृद्धांपासून सर्वांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान माणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. सुख आणि दुःख या संसारातील चढ-उतारात ग्रामस्थ आपल्या मातेला कधीच विसरत नाहीत. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा व अपयशावर मात करून उत्तुंग यशाचे शिखर गाठण्याची ताकद आपल्याला देवीच्या आशीर्वादानेच मिळते, अशी अतूट श्रद्धा ग्रामस्थांच्या मनात आहे.
बामणोली डिंगणकरवाडी, पूर्व वणेवाडी, पश्चिम वणेवाडी, गवळवाडी आणि ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी सुमारे १०० वर्षापूर्वी बामणोली 'पिंपळ' याठिकाणी मंदिराची स्थापना केली. या मंदिरात दगडी पाषाणाच्या रेखीव व सुबक आकाराच्या मूर्तींची स्थापना केली. पूर्वी गावात वीज नव्हती तेव्हा तेलाच्या वातीवर मंदिराचा गाभरा व मंडप तेजोमय होत असे. बदल्या काळानुसार आता मंदिर वीजेच्या आकर्षक रोषणाईने प्रकाशमय झाले आहे. पूर्वीच्या ग्रामस्थांनी मंदिर उभारून डोक्याला भरजरी फेटा आणि अंगात सदरां घालून डफावर थाप मारली व देवीचे खेळी मानाने सेवेत रुजू झाले.
कालांतराने सन १९८४ मध्ये मातेच्या मंदिराचे बांधकाम करून कौलारू मंदिर बांधण्यात आले. यावेळी जुन्या मूर्ती पाण्यात विसर्जित करण्यात आल्या. त्या जागी नवीन मूतींची स्थापना केली. परंतु या मूतींमध्ये देवत्व आले नसल्याची भावना मानकरी व गावकरी यांच्या मनात आली. कारण देव वोलेना अशी - परिस्थिती निर्माण झाली. त्यावर काय करावे हेच गावकऱ्यांना सुचत नव्हते, शेवटी पाण्यात विसर्जित केलेल्या पाषाणी मूर्त्या ग्रामस्थांनी शोधून पुन्हा पाण्यातून बाहेर काढल्या, त्यांची विधिवत स्थापना केल्यावर चमत्कार व्हावा. असेच झाले. सर्व मूर्तींमध्ये देवपण आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जुन्या मंदिराच्या जडणघडणीमध्ये गावातील काही प्रमुख व्यक्तींचा सहभाग उल्लेखनीय होता. त्या काळातील लोक शिक्षणाची कमी व अर्थिक साधनाची उपलब्धता नसतानाही देवोंचे उत्सव मात्र, मोठ्या दिमाखदार सोहळ्यात साजरे करीत असत. सन २०१३ मध्ये या देवीचे मंदिर नव्या स्वरूपात गावकऱ्यांनी बांधले, देवीच्या मंदिरात भक्तांची वर्षभरात मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. मात्र, नवरात्रौत्सवाला मंदिरात भक्तांची रीघ लागते.
अखंड गावावर आपली कृपादृष्टी धरून संकटसमयी भक्तांच्या रक्षणार्थ धावून येणाऱ्या मातेचे मंदिरात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये नवरात्र उत्सव अखंडपणे गेली अनेक वर्षे देवीच्या मंदिरात सुरू आहे. श्री चंडकाई वाघजाई देवीचे हे डोलदार मंदिर गावाच्या मध्यभागी असल्याने मंदिरात नेहमीच भक्तांची ये-जा सुरु असते, त्यामुळे प्रत्येक देवीच्या उत्सवात गावकरी दर्शनाला येत असल्याने नवरात्रौत्सवात सुध्दा नऊ दिवस-रात्र या संपूर्ण देवीचे मंदिर विद्युत रोषनाईने सजविले जाते. मंदिराचा संपूर्ण परिसर गावकरी श्रमदानातून
स्वच्छ करतात. मंदिरासमोर दर दिवशी सड़ा रांगोळी काढली जाते . नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सुरु असते. रोज संध्याकाव्ये मंदिरात सामूहिक महाआरती करण्यासाठी गावकरी जमा होतात. दररोज सुमधुर भजन, जाखडी व दांडिया नृत्य यामुळे मंदिरात भक्तांची मांदियाळी जमा होते. माहेरवाशिणी आपल्या मनातील भावना देवीच्या चरणी येऊन मनोमनी गाऱ्हाणे सांगतात. बामणोलीची ही रक्षणकर्ती श्री चंडकाई माता सुध्दा या माहेरवाशिणींना कधीच निराश करीत नाही, असा आजपर्यंत या देवीचा महिमा आहे. दररोज मंदिरात गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ देवीची सेवा बजाब. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होताना मंदिरात सोने
लुटण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होते. मुंबई व पुणे अशा शहारातून सुध्दा भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र, या जागृत देवस्थानाच्या स्थापनेपासून सुस्थितीत व नियोजनबध्द कारभार करताना गावकर, मानकरी आणि ग्रामस्थ यांची मोलाची भूमिका बजावली. आता देवस्थानचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालविला जातो. अशी ही जागृत व नवसाला पावणारी देवी असून ग्रामीण भागात मंदिर असतानाही या चंडकाई मातेचा महिमा सर्वदूर पोहोचला आहे, त्यामुळे श्री चंडकाई देवीचा महिमा अगाध असून नेहमीच सर्वांच्या हाकेला धावणारी 'आई'च असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे.
.