पाडलोस भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ प्रथम

Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:32 PM
views 92  views

सावंतवाडी : पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप आयोजित श्री देव रवळनाथ मंदिरात पार पडलेल्या "राग आमचे भजन तुमचे" जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, जाणवली (बुवा - योगेश मेस्त्री) यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर द्वितीय श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे (बुवा - नरेंद्र मेस्त्री), तृतीय क्रमांक श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, असरोंडी (बुवा - विशाल सावंत) यांना प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात प्रथमच व्हॅाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून "राग आमचे भजन तुमचे"  संकल्पनेवर भजन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ, तळवडे (बुवा - उदय नागडे) यांना मिळाला. तर व्दितीय प्राथमिक शिक्षक कलामंच, कुडाळ (बुवा - राजेश गुरव), उत्कृष्ट गायक श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे (बुवा - नरेंद्र मेस्त्री), उत्कृष्ट हार्मोनियम 

श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सातूळी (अजिंक्य कळंगुटकर), उत्कृष्ट पखवाजवादक, प्रथमेश राणे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे, उत्कृष्ट तबलावादक सिद्धेश वेगुर्लेकर प्राथमिक शिक्षक कलामंच, कुडाळ तर उत्कृष्ट झांजवादक भालचंद्र आजगावकर प्राथमिक शिक्षक कलामंच, कुडाळ यांना मिळाला. उत्कृष्ट कोरस म्हणून श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ, तळवडे (बुवा - उदय नागडे), उत्कृष्ट गजर श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सातूळी (बुवा - अमित परब), उत्कृष्ट राग सादरीकरण श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, जाणवली (बुवा - योगेश मेस्त्री) यांना मिळाला. 

        सर्व विजेत्या मंडळांचे ग्रुपचे अध्यक्ष लिंगाजी (शाणू) पाडलोसकर, उपाध्यक्ष आबा सातार्डेकर, सचिव अमेय गावडे, सहसचिव विठू गावडे, खजिनदार पपी गावडे, सहखजिनदार रोहित गावडे, हिशोब तपासणीस प्रणित गावडे, प्रसिद्धी माध्यम विश्वनाथ नाईक यांसह ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थांनी अभिनंदन केले. स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समालोचक राजा सामंत यांनी केले. प्रास्ताविक राजू शेटकर यांनी तर प्रकाश करमळकर यांनी आभार मानले.