श्री देव वेतोबाचे 30 फुटी कट आऊट वेधतायत लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: July 15, 2023 19:44 PM
views 317  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रपाल श्री देव वेतोबावर आधारित मालिकेेचा भव्य “ प्रिमियर” सावंतवाडी शहरात १७ जुलैला होत आहे. या प्रमोशनच्या पार्श्वभूमीवर संस्थानकालीन राजवाड्याकडे तीस फुटी वेतोबाचे कट आऊट उभारण्यात आले असून सावंतवाडीकर नागरिकांसाठी ते एक आकर्षण ठरले आहे. याच ठिकाणी सोमवारी १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देव वेतोबाची आरती करुन शहरात रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर येथील वैश्य भवनात खास महिलांसाठी 'आनंदी सोहळा ' आयोजित करण्यात आला आहे.