
कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे तसेच डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने "श्रावणधारा 2025 "या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, 10 ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम फेरी रविवार 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.
स्पर्धेसाठी स्पर्धकाला मराठी भावगीत, भक्तीगीत, गझल किंवा अभंग यापैकी कोणत्याही एका प्रकारात गीत सादर करता येईल. स्पर्धा इयत्ता 5 वी ते 8 वी, इयत्ता 9 वी ते 12 वी व खुला गट अशा तीन गटात होणार असून तीनही गटांमध्ये प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जातील, तसेच सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. सदर स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. प्राथमिक फेरीसाठी नाव नोंदणी दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत करावी. अधिक माहितीसाठी 9890520888 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.