श्रद्धाराजे भोंसले - नगरसेवकांच्या प्रचाराचा नारळ फोडला

Edited by: विनायक गांवस
Published on: November 19, 2025 19:29 PM
views 45  views

सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवस्थानला श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. 


सावंतवाडी शहरासाठी राजघराण्याने दिलेले योगदान व भाजपच्या माध्यमातून त्यांना मिळणारी सत्तेची जोड यातून सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री नितेश यांनी व्यक्त केला.यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषदच्या माजी सभापती शर्वाणी गावकर, भाजपा कायदा सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शेखर गांवकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मधुकर देसाई, राघू चितारी, अमित परब, ॲड. संजू शिरोडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.