वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षापदी श्रद्धा रावराणे बिनविरोध

Edited by:
Published on: February 24, 2025 18:41 PM
views 403  views

वैभववाडी : वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदी भाजपच्या श्रद्धा रावराणे यांची बिनविरोध निवड झाली. या घोषणेनतंर भाजप कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी केली.

नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी पक्ष धोरणानुसार काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर या पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती.१८ फेब्रुवारीला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी नगराध्यक्षपदाकरीता श्रध्दा रावराणे यांचा एकमेव नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते.त्याचवेळी ही निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, आज प्रांतधिकारी जगदीश कातकर यांनी ही निवड प्रकियेची औपचारीकता पार पाडली.आज सकाळी ही निवड प्रक्रिया पार पडली. सौ.रावराणे यांची निवड जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यानी फटाक्याच्या आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.निवडीनंतर सौ.रावराणे शहरातील दत्त मंदिर,आदिष्टी व स्वामी समर्थ मठात जाऊन दर्शन घेतले. नगराध्यक्ष सौ.रावराणे यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महीला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, महीला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर,उपनगराध्यक्ष संजय सावंत,भालचंद्र साठे,दिगबंर मांजरेकर,रणजित तावडे,सुनील रावराणे,रवींद्र रावराणे, नारायण मांजरेकर आदी पदाधिकाऱ्यांनी सौ.रावराणे यांचे पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले.निवडीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सौ.रावराणे म्हणाल्या, शहरातील प्रलंबित प्रश्न पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.तसेच सर्वांच्या साथीने शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले.