विरोधकांना युवासेनेचे ताकद दाखवून द्या : योगेश कदम

भिंगळोली येथे युवासेनेचा मेळावा संपन्न
Edited by:
Published on: October 16, 2024 12:50 PM
views 292  views

मंडणगड : जनतेचे प्रश्न व विकासकामे न करता जातीजाती गावागावामध्ये वाद निर्माण करणाऱ्यांना गावाचे वेसीच्या बाहेरुन हाकलून द्या, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी भिंगळोली येथे केले. युवा व युवतीसेना यांच्या माध्यमातून १४  ऑक्टोंबर २०२४ रोजी 'जल्लोष विजयचा' या शिर्षकाखाली आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित युवा शिवसैनिकांना संबोधीत करताना ते बोलेत होते. यावेळी ते पुढे म्हणाले शिवसेनेचा मतदार संघात खाली उतरेला भगवा आपण गेल्या निवडणुकीत विजय संपादीत करुन पुन्हा डौलाने फडकाविला व त्याची पुुनरावृत्ती आपल्याला येवू घातलेल्या निवडणुकीत करुन इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी आजपासूनच कामाला लागा योगेश कदम नव्हे तर आपण सर्व योगेश कदम आहात या भावनेने कामाला लागा व विरोधकांना नामोहरक करुन टाका. बेसावध राहू नका आपल्या विरोधक वेगवेगळ्या मार्गाने आक्रमण करतील पण आपण गावागावात केलेल्या विकासकामांचे आधारे मते मागत आहोत पण आधी करुन दाखविले आहे ,असे सांगताना त्यांनी सर्व विरोधकांचा चांगलाच सामचार घेतला व तालुक्यात निवडणुकीची वातावरण निर्मीती केली. तालुक्याचे विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून रस्ते पाणी या पायाभुत सुविधांची कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत , पण इतके पुरसे नसून तालुक्याचा बेरोजगाराची व आऱोग्य सुविधांचा प्रश्न सोडवणे हा आपल्या अग्रक्रमाचा विषय असून तालुक्यात शंभर बेडचे हॉस्पिटल व औद्योगीक वसाहतीसाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पक्षाच्या धोरणानुसार युवकांनी वीस टक्के राजकारण व ऐशी टक्के समाजकारणावर भर देण्याचा सल्ला यावेळी दिला. जातीच्या राजकारणाला आपल्याकडे थारा नसल्याचे स्पष्ट करताना सामाजातील प्रत्येक गरजवंताची समस्या सोडवणे हे आपले काम असल्याचे व त्यासाठी काम करीत असल्याचे सांगताना मोठ्या मताधिक्याने विजयश्रीचा विश्वासही यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास युवासेनेचे चेतन सातोपे, निलेश मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, शशिकांत चव्हाण, माजी सभापती आदेश केणे, अमिता शिंदे, रामदास रेवाळे, अस्मिता केंद्रे, विनोद जाधव, संदेश चिले, उप शहर प्रमुख निलेश गोवळे, मुश्ताक दाभीळकर, निलेश सापटे, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, अनिल रटाटे, संदेश चिले यांच्यासह बेसीक कार्यकारिणी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.