
सावंतवाडी : गोवा - बांबोळी येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जीएमसीच्या रक्तपेढी विभागाने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. दरम्यान, संजय पिळणकर यांनी त्यांना तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देऊन सातार्डा - देऊळवाडी येथे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नं १ येथे उद्या शुक्रवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सदर रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. इच्छुकांनी संतोष कांबळी (9881088809), भाऊ मांजरेकर (9168244182), उमेश कांबळी (7798928114), वासुदेव राऊळ (8554078272), दिगंबर कवठणकर (9421920365) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.