जलजीवन मिशन अंतर्गत लघुचित्रपट स्पर्धा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 26, 2023 15:17 PM
views 73  views

सिंधुदुर्ग : जलजीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट 15 जानेवारी 2024 पर्यत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. जलजीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वता: केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकाल्पना, संवाद, पाश्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वता केलेले असावे. या अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी,शासकिय विभाग त्यानी त्याच्या कामाकरीता तयार केलेले लघुचित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यात येऊ नयेत. लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे.लघुचित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावनारे नसावे. या स्पर्धेकरीता 3 ते 5 मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार सादर करावयाचा आहे. कॉपी राईट उल्लघन होत नसलेबाबत स्वयंघोषणापत्र स्पर्धकांनी स्वता द्यावयाचे आहेत.
 
या स्पर्धेकरीता लघुचित्रपटाचे विषय - 1. पाण्याचे शाश्वत स्त्रोत 2. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती 3. जल संवर्धन 4. हर घर जल घोषित गाव 5. जल जीवन मिशन यशोगाथा 6.विविध योजनांचे कृती संगम प्रमाणे आहेत. तर  स्पर्धेकरीता बक्षिस रक्कम रुपये प्रथम क्रमांक- 31000/- व्दितिय क्रमांक-21000/- व तृतिय क्रमांक -11000/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र अशी असणार आहे. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडिचे अधिकार  प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील. जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धेत जिल्ह्यातील लघुचित्रपट निर्माते यांनी सहभाग घेऊन आपले लघुचित्रपट दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडे सादर करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.