धक्कादायक | शेतकऱ्यावर बिबट्याची झडप ! आरडाओरडा करून वाचवले प्राण !

दिनेश गावडे यांनी जखमीला केले रुग्णालयात दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2023 10:05 AM
views 204  views

आंबोली : चौकुळ येथील रामचंद्र उर्फ भाऊ जाधव यांच्यावर घराच्या मागे ५० मीटरवर म्हशी बघायला गेले असताना बिबट्याने उडी मारली. त्यामुळे भाऊ जाधव यांना डोक्याला जखम झाली. यानंतर आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला. ही घटना काल मंगळवारी रात्री ९ वाजता घडली.     


चौकुळ येथील रामचंद्र प्रकाश जाधव उर्फ भाऊ जाधव यांच्या मागच्या बाजूला त्यांच्या 2 म्हैशी बघायला गेले असताना पाठीमागे ५० मीटरवर बिबट्यानं त्यांच्यावर झडप घातली. यात जाधव यांनी दुसरीकडे उडी मारल्याने भुवयाच्या मध्ये दगड लागला. त्यामुळे ते जखमी झाले. यावेळी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला.


जखमीला सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आंबोली आरोग्य केंद्रात रात्री १० वाजता दाखल केले. या ठिकाणी उपचार केले. यावेळी वेळी वनक्षेत्रपाल विद्या घोटगी, वनपाल अमोल पटेकर, भिंगारदिवे तसेच सर्व वनविभाग स्टाफ उपस्थित होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात चौकुळ ग्रामस्थांनी मागणी केली आहे.