रेडी जि. प. विभागात उद्धव ठाकरे शिवसेनेला धक्का...!

विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Edited by: दिपेश परब
Published on: October 20, 2023 18:12 PM
views 298  views

वेंगुर्ले : रेडी जिल्हा परिषद विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, व शिवसैनिक यांनी आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उबाठा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज सावंतवाडी येथे झालेल्या या पक्ष प्रवेशा मध्ये शिरोडा मच्छिमार संस्था चेअरमन काशिनाथ निळकंठ नार्वेकर  प्रथमेश बांदेकर शिरोडा, ग्रा.पं.सदस्य, रवी पेडणेकर शिरोडा माजी उपसरपंच, कृष्णा चोपडेकर, शिरोडा मा. ग्रा.प. सदस्य,  शितल साळगांवकर वेंगुर्ले उपतालुका संघटिका, हर्षा परब उपविभाग संघटिका, संदिप मसुरकर शाखाप्रमुख, पुंडलिक कुबल शिरोडा माजी ग्रा.पं. सदस्य, संजना नार्वेकर शिरोडा माजी ग्रा.पं. सदस्य, गौरव बर्डे शिरोडा शिवसैनिक, संजय धुरी शिरोडा शिवसनिक,  देशपाल कोळमकर शिरोडा शिवसैनिक, शिवा तारी शिरोडा माजी अध्यक्ष चौगुलेश्वर देवस्थान केरवाडा आणि संजय नार्वेकर शिरोडा शिवसैनिक यांचा समावेश आहे.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डूबळे, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, सुनिल मोरजकर तसेच सचिन देसाई, योगेश तेली आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.