जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात

Edited by: संदीप देसाई
Published on: June 06, 2024 11:26 AM
views 208  views

सिंधुदुर्ग : शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीचे विधिवत पुजन करुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, किशोर काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांचेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.