
वेंगुर्ले: वेंगुर्ला तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
वेंगुर्ले तालुका शिवसेना पक्षाची मासिक सभा आज १२ एप्रिल सप्तसागर येथील तालुका कार्यालयात संपन्न झाली. हा प्रवेश संपन्न झाला. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, कोस्टल विभाग तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, महिला उपजिल्हाप्रमुख शीतल साळगावलर, कोचरा सरपंच योगेश तेली, महिला शहर प्रमुख श्रद्धा परब- बाविस्कर, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे, विभाग प्रमुख दत्ता साळगावलर, पूजा सोनसुरकर, योगिता कडुलकर - धुरी, संतोष परब यांच्यासहित तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.